Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे घरगुती वीजबिल मागण्यावरून वाद; एकास बेदम मारहाण, पोलीसात गुन्हा

यावल प्रतिनिधी । शहरातील आझादनगर परिसरात विज बिलाची रक्कम मागण्याच्या कारणावरून तिघांनी एकाला जातीवाचक शिविगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरोधात यावल पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, यावल शहरातील आझादनगर परिसरात राहणारे गनी अकबर पटेल (वय-६०) यांच्याकडून शोभाबाई बाबुलाल पारधे यांनी घरगुती वापरासाठी विजपुरवठा घेतला आहे. याच संदर्भात १७ जुलै रोजी सायंकाळी १९.३० वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी गनी अकबर पटेल यांनी वापरलेल्या विज बिलाची रक्कम मागीतल्याच्या कारणावरून गनी पटेल आणि त्यांच्या मुले कय्युम गनी पटेल आणि नय्युम गनी पटेल यांनी शोभाबाई बाबुलाल पारधे यांचा मुलगा प्रल्हाद बाबुलाल पारधे यास चापटा बुक्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच काठीने डोक्यास मारून दुखापत केली. शोभाबाई बाबुलाल पारधे यांच्याफिर्यादीवरून संशयीत आरोपी गनी अकबर पटेल , कय्युम गनी पटेल व नय्युम गनी पटेल यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे करीत आहे .

Exit mobile version