Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे कायदेविषयक महाशिबीराचे उद्घाटन (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यावल तालुका विधी सेवा समिती आणि यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने यावल तहसील कार्यालयाच्या आवारात आज कायदेविषयक महाशिबीराचे उद्घाटना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस.डी. जगमलानी यांच्याहस्ते करण्यात आले.

या महाशिबीराच्या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायधीश एस .डी. जगमलानी, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या .एम.एस .बनचरे,  जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव ए. ए. शेख, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या महाशिबीरात तालुका विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा समिती, पोलीस विभाग, पंचायत समिती, सेतू सुविधा, पोस्ट ऑफीस, महसुल विभाग, नगर पालिका यावल, सामाजिक वनिकरण विभाग, प्रादेशिक वनविभाग, आदिवासी विकास विभाग, पशुसंवर्धन उपायुक्त, कृषि विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, बँक, एलआयसी, विज वितरण महामंडळ, आरटीओ, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन, वजन व मापे विभाग आणि जिल्हा कौशल्य व रोजगार  विभाग असे स्टॉल लावण्यात आले असून यावेळी उपस्थित नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

महाशिबीर यशस्वितेसाठी विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, जिल्हा आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, तहसीलदार महेश पवार, यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर , सहाय्यक गट अविकारी किशोर सपकाळे , नगर परिषदचे प्रभारी मुख्यधिकारी अविनाश गांगोडे , यावलचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड धीरज चौधरी, सचिव अॅड. एन. पी. मोरे व वकील संघाचे सर्व सदस्य परिश्रम घेतले.

 

Exit mobile version