Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे काँग्रेस कमेटीतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

यावल प्रतिनिधी । लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त यावल येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या सहभागृहात तालुका कॉग्रेस कमेटीतर्फे जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्याहस्ते लोकशाहीर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी यावल शहर काँग्रेस कमेटी शहराध्यक्ष कदीर खान, अनु.जाती विभागाच्या काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, तालुका उपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शहा, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर तडवी, नईम शेख, सद्दाम शहा, ईमरान पहेलवान, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू पिंजरी, गुलाम रसूल मेंबर नगरसेवक मनोहर सोनवणे, सकलेन शेख आदी काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.

Exit mobile version