Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे काँग्रेस कमेटीची बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील काँग्रेस कमेटीच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारने सुडबुध्दीतून राहूल गांधी यांच्यावर कारवाई केली आहे. याच्या निषेधार्थ यावल काँग्रेस कमिटीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आली.

 

याप्रसंगी माजी आमदार रमेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, पं.स.चे माजी गटनेते शेखर पाटील, कृउबाचे माजी सभापती नितीन चौधरी, भगतसिंग पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, पुंडलीक बारी, नावऱ्याचे माजी सरपंच समाधान पाटील यांच्यासह यावल तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

यावेळी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस पक्षाची भुमिका व सद्यस्थितीला देशाची परिस्थिती या विषयावर उपस्थितांनी आपले विचार व पक्षाची भुमिका मांडली यावेळी पत्रकारांशी बोलतांना कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ७ फेबुवारीला संसदेत गौतम अडानी यांच्या घोटाळ्या संदर्भात सरकारकडे प्रश्न विचारले, यात अडानी समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रुपये कोणाचे, नरेन्द्र मोदी आणी गौतम अडानी यांचा संबध काय ? विमानतळ, संरक्षण क्षेत्र, उर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अडानी कशी मदत केली, असे अनेक गंभीर प्रश्नांचे उत्तर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारल्याने देशातील मोदी सरकार कड्डन नेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले.  त्यावर राहुल गांधी यांनी बोलण्याची तयारी दाखली, मात्र त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नाही. गौतम अडानीच्या चक्रव्युहा फसलेल्या मोदी सरकारया घोटाळा प्रकरण बाहेर येइल, या विषयाला घाबरून राहुल गांधी यांच्यावर गुजरातच्या कोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल, एका मानहानीच्या प्रकरणात सुडबुध्दीने कार्यवाही करीत दोन वर्षाची शिक्षा सुनावली व त्यांची खासदारकी रद्द करण्याचे षड्यंत्र रचले अशा या मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारचा जाहीर ‘ निषेध या पत्रकार परिषदेत नोंदविण्यात आला .

Exit mobile version