Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महसूल, पोलीस व पत्रकारांना मास्कचे वाटप

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महसूल प्रशासनाच्या विभागातील अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासन व पत्रकारबांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मास्क वितरित करण्यात आले.

येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील, पं.स.चे माजी उपसभापती सिताराम पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले राजोरा, ग्रा.पं. माजी सरपंच पाटील यांच्यासह पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सपोनि जितेंद्र खैरनार, पोउनि सुनिता कोळपकर यांच्या उपस्थितीत महसूल कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी यांना मास्क वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी माजी आ. रमेश चौधरी, माजी जि.प.सदस्य सदस्य व यावल खरेदी-विक्री संघाचे चेअरमन आर.जी. पाटील, यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यावल तालुक्यातील अजून काही प्रशासकीय कार्यालयात कार्य करणाऱ्यांना मास्क वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरधर काशिनाथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Exit mobile version