यावल येथे काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन

यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात यावल शहरात काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावर आरती करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये यावल येथे केंद्र शासनाच्या विरूद्ध लक्षणीय आंदोलन प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील यांची  प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.  केंद्र सरकारचे ३० मे २०२१ रोजी ७ वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कार्यकाळात देशात काळेखच पसरला आहे. देशाची ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना साथ रोगामध्ये नियोजनातील अपयश, दररोज पेट्रोल व डिझेल भाववाढ, नोटबंदी, जीएसटीसारखे अपयशी निर्णय, केंद्रातील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे इत्यादी पातळीवर देश देशोधडीला लावणारे केंद्रातील मोदी सरकार पुर्णपणे अपयशी झाले आहे. 

याप्रसंगी शहराध्यक्ष कदीर खान, नगरसेवक रसुल शेख गुलाम दस्तगीर, ओबिसी सेलचे अध्यक्ष अमोल भिरुड, नगरसेवक समिर मोमिन, कॉंग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष रहेमान खाटीक, शहर सरचिटणीस नईम शेख, मागसवर्गीय अध्यक्ष विक्की गजरे, युनुस भाई, अस्लम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ता आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. 

Protected Content