Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे आज शंभर वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी महाराज रथोत्सव यात्रा

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला व सुमारे एकशे सतरा वर्षांचा इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सवानिमित्ताने सकाळी रथाची विधिवत पूजा करण्या आली असून रथोत्सवाला सायंकाळी ५ वाजता प्रारंभ होणार आहे. यासोबत आज सायंकाळी खंडेरावाच्या बारागाडया ओढल्या जाणार आहेत.

 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दोन वर्ष रथोत्सव साजरा होऊ न शकल्यामुळे या वर्षी रथोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. यानिमित्त शहरात पाहुण्यांची गर्दी झाली आहे. रथोत्सवानिमित्त येथे हरीता नदीपात्रात मोठी यात्रा भरली आहे.

सुमारे १९०५ मध्ये येथे शहरात श्री. हळबे यांनी रथोत्सवास सुरवात केल्याची आख्यायिका आहे. १९१४मध्ये रथोत्सवाची जबाबदारी पांडूरंग धोडू देशमुख यांच्याकडे आली. १९५७ पर्यंत रथोत्सव साजरा करताना घरातून पैसा खर्च करून उत्सव साजरा केला जात होता. १९५७मध्ये विश्वस्त मंडळ स्थापन करुन भाविकांकडून आलेल्या देणगीवर हा उत्सव आज अखेरपर्यंत साजरा केला जात आहे. १९१४ पासून ते आज अखेरपर्यंत श्री. देशमुख यांचे घराण्यातच या उत्सवाचे प्रमुखत्व आहे.

१९०५ मध्ये रामजी मिस्त्री यांनी तयार करण्यात आलेल्या नक्षीदार कोरीव कामाचे रथाचे १९७७ मध्ये रामजी मिस्त्रीच्या मुलांमार्फत नूतनीकरण करण्यात आले. संपूर्ण सागवानी लाकडाचा कोरीव नक्षीदार काम असलेला रथ उत्कृष्ट कामगिरीीचा अप्रतिम नमुना आहे. हा रथ २२ फूट उंच असून १८ टन वजनाचा आहे. त्याची चारही चाके बाभळ्च्या लाकडाची आहेत. रथावर बालाजी महाराजांची मूर्ती असते. याशिवाय दोन अश्व, त्यांना हाकणारा सारथी, दोन्ही बाजूला दोन देवतांच्या मूर्त्या आहेत. रथाचे उंच मनोऱ्यावर हनुमान मूर्ति आरूढ आहे.

महर्षी व्यास मंदिराजवळ सकाळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी हरीता नदीपात्रात खंडेरायाच्या बारागाडया ओढून झाल्यावर बालाजी महाराजांचा रथ शहरात मुख्य रस्त्यावर मार्गक्रमण करीत निघतो.

भाविकांच्या मदतीने शहरात ओढला जाणारा रथ मुख्य रस्त्यावर येतांना त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम रथाच्या चाकांना मोगरी लावणारा करतो. ही मोगरी लावण्याची परंपरा रामजी मिस्त्री यांच्या वंशजा नंतर गंगाधर दांडेकर, बाबूराव सोनार, हरी मिस्त्री, अशोक लोहार यांचे सह सुतार लोहार घराण्यातील परंपरा आहे. सध्या दिलीप मिस्त्री, अशोक मिस्त्री, किशोर दांडेकर हे समर्थपणे सांभाळत आहेत.

शहराच्या मुख्य रस्त्यावर आला असल्याची सूचना देणारे विशेष पारंपारीक वेशात असलेले भालदार व चोपदार गल्लीबोळात फिरुन भाविकांना बालाजी दर्शनासाठी आले आहेत. आरती घेऊन चला, अशी हाक देत ते फिरत असतात. ही जबाबदारी शिवाजी चौधरी, राजू देशमुख, सुरेश वराडे पार पाडत आहेत.पूर्वी ही जबाबदारी  ज्योतीबा कदम पार पाडीत.
रथावर आरूढ बालाजी महाराजांना आरती दाखविणे, भाविकांच्या आरीतीच्या ताटात प्रसाद देणे आदी पौराहित्य काशीनाथ बयाणी यांचे नंतर १९४०ते १९७३दरम्यान वासुदेव बाबा बयाणी , राजाभाऊ नागराज यांनी केले. काही वर्ष भैय्याजी अग्निहोत्री यांनी काम पाहीले. १९७३नंतर रमेश शास्त्री बयाणी, नारायण बयाणी, बळवंत जोशी यांनी जबाबदारी पार पाडली. २००६पासून महेश बयाणी, विनोद बयाणी, संजय बयाणी, सुनिल जोशी हे जबाबदारी पार पाडत आहेत.

रथ नदीवर धुवायला नेणे, त्याची रंगरंगोटी, तेलपाणी, फुलांच्या माळांनी, विद्दूत रोषणाईने सजविण्याचे काम सुरवातीपासून बरडीवरील रहिवासी लोकांकडे आहे. यात भागवत पवार, गोविंदा खैरे, माधव वराडे, भागवत ढाके हे प्रमुख आहेत.

सायंकाळी मार्गक्रमण करणारा रथ रात्रभर शहराच्या मुख्य रस्त्यावरून फिरुन पहाटे रेणूका देवीचे मंदिराजवळ आपल्या नियोजित स्थळी परततो.

रथोत्सव विश्वस्त समिती अशी…
संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत देशमुख, सदस्य शिरीष देशमुख, श्रीहरी कवडीवाले, दगडू मंदवाडे, पुंजो पाटील, महेश बडगुजर, जगदीश देवरे, राजेंद्र निकुंभ, सुनिल भोईटे, अभय महाजन, किशोर कुलकर्णी, काशिनाथ बारी.

 

Exit mobile version