Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे अखंड नाम जय यज्ञ सप्ताहाला सुरूवात

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शहरातील भुसावळ रोड वरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित येथील दत्त जयंतीनिमित्त जयंती श्री स्वामी समर्थ नाम जप सोहळा भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.

यावल येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ श्री स्वामी समर्थ बाल संस्कार व सेवा केंद्र येथे दत्त जयंती निमित्त सात दिवशीय अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सुरूवात आज १ डिसेंबर २०२२ गुरुवार पासुन झाली आहे. यात गुरुचरित्र पारायण सोहळा विविध देवतांचे यज्ञ मंडपात मांडणी व पूजन तसेच सात दिवस अखंड रात्रंदिवस विना वादन श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आचे वाचन असे अखंड सात दिवस सुरू राहील यात दिवसा सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत यावल व तालुक्यातील महिलांनी तर संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत तर पुरुषांनी अखंड नामजप सप्ताहात मोठ्या उत्साहाने यावल शहरातील व तालुक्यातील भाविकांनी मोठया संख्येत आपला सहभाग नोंदवित आहे.

प्रत्येक दिवशी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे यात पहिल्या दिवशी ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी, अग्नी प्रदीपण व दुसऱ्या दिवशी मंडळ स्थापना, अग्नी स्थापना ,स्थापित देवता हवन

तिसऱ्या दिवशी नित्य सहकार गणेश याग मनोबल, चौथ्या दिवशी नित्य सहकार चंडी याग, स्वामी याग, रुद्र मल्हार याग, बली पूर्ण होती व नंतर सत्यदत्त पूजन ,देवता विसर्जन व अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आहे.तसेच यावल तालुक्यात किनगाव, सांगवी, साकळी,डाभुर्णी मिनी सप्ताह घेण्यात येत आहे तेथे ही

गुरुचरित्र पारायण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे.

८ डिसेंबर रोजी सकाळी भूपाळी आरती सत्यदत्त पूजन व त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महानैवेद्य आरती अखंड नामजप यज्ञ सप्ताह समारोप होईल. या सप्ताह प्रसंगी स्वामी समर्थ केंद्रातील प्रमुख प्रतिनिधींनी सेंद्रिय शेती सामूहिक सामुद्रिक शास्त्र पर्यावरण प्रकृती विवाह संस्कार व पशुसंवर्धन मुलांवर संस्कार कसे करावे या विविध विषयांवर मार्गदर्शन व आपल्या जिवनात विविध समस्या येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन ह्या विविध विषयावर सात दिवस वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या सप्ताहात अखंड चालणाऱ्या

श्री स्वामी समर्थ नाम जप, विन वादन , व स्वामी चरित्र ग्रंथ वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिनिधी व सेवेकरी याच्या कडून करण्यात येत आहे.

यासाठी केंद्र प्रमुख ता.प्रतिनिधी केंद्र प्रतिनिधी व तसेच कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र यावल केंद्रातील सेवेकर्‍यांनी परिश्रम घेत आहे.

Exit mobile version