Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील श्री व्यास धनवर्षा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सतिश यावलकर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेची सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक बिनविरोध पार पडली. यात अध्यक्षपदी डॉ. सतिष यावलकर तर उपाध्यक्षपदी हेमंत चौधरी यांची निवड करण्यात आली.

या वेळी बैठकीस सर्व नवनिर्वाचीत संचालक उपस्थीत होते. नवनियुक्त संचालक मंडळात सतिश सुपडू यावलकर (अध्यक्ष ) , हेमंत एकनाथ चौधरी (उपाध्यक्ष ), शरद वासुदेव यावलकर, अभिमन्यु फत्रु बडगुजर, जगदिश रत्नाकर कवडिवाले, महेश वासुदेव वाणी, यशवंत वना सोनवणे, दिलीप पद्माकर नेवे, सुरेश गणपत वाणी, किरण बालजी अट्रावलकर, नितीन त्रंबक हडपे व सुनिता विलास गडे उपस्थित होते.

यावेळी अभिमन्यु बडगुजर, जगदिश कवाडिवाले, हेमंत चौधरी बँकेचे सीईओ चंद्रकांत वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलतांना बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी योग्य निर्णय व कठोर परिश्रम करू असे निवड झालेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश यावलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जे. बी. बारी होते तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.पी. भारंबे होते.

Exit mobile version