Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील शिव भोजन केंद्राची चौकशी करा : शिवसेना महिला आघाडीची मागणी

 

यावल, प्रतिनिधी । राज्य सरकारने उद्दात हेतूने सुरु केलेल्या शिव भोजन थाळी योजनेस प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत यावल येथील केंद्र एका महिला बचत गटास देण्यात आला आहे. याबाबत बचत गटाच्या कार्यप्रणालीबाबत यावल शिवसेना महिला आघाडीने आक्षेप घेऊन याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांना तक्रार केली असता आ. पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे या केंद्राच्या चौकशी मागणी केली आहे. 

या संदर्भात यावल येथील शिवसेनेच्या महीला आघाडीच्या पदाधिकारी सपना अनिल घाडगे यांनी आ. चंद्रकांत पाटील यांचेकडे केलेल्या तक्रारीत सदरचे हे शिव भोजन थाली केन्द्र कशा प्रकारे नियम निमबह्याय असल्याचे पुरावे दिले आहेत.  सुनिता अनिल भावसार या महीलेने एसटी महामंडळात कायमस्वरूपी नौकरीस असतांना पतीचे नाव असलेल्या कागदपत्रांच्या आधारे शिवशक्ती महीला बचत गट स्थापन केली आहे.  त्या या गटाचे सचिव आणि  उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. त्यातच त्यांच्याकडे दारिद्रय रेषेखालील कार्ड देखील असल्याने एकंदरीत या शिव भोजन थाली केन्द्राची ठेकेदारीच्या विषयामध्ये सर्व प्रकरणात शासनाच्या योजनांचा दुरुपयोग करीत असल्याचे दिसुन येत आहे.  आपण तात्काळ या सर्व विषयाची चौकशी करून आपल्या स्तरावर उचित कारवाई करावी अशा मागणीचे लिखित पत्र मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे दिले आहे. या संदर्भातील एक पत्र शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवीन्द्र सोनवणे , पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यभान तायडे , सेनेचे माजी तालुका प्रमुख कडु पाटील , विजयसिंग पाटील , शरद कोळी ,आदीवासी सेनेचे तालुका अध्यक्ष हुसैन तडवी,पप्पु जोशी , संतोष खर्च , अजहर खाटीक , मोहसीन खान आदी महीला कार्यकर्त्यांनी निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना दिले आहे .

 

Exit mobile version