यावल येथील महाविद्यालयात उर्जा संवर्धनावर कार्यशाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऊर्जा संवर्धनावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील  होते. प्रमुख अतिथी म्हणून भालोद येथील महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. आर. बी. इंगळे  व यावल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भूगोल विभागाचे  प्रा. एन. ए. पाटील  होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.पाटील यांनी ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज आहे.दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून  पर्यावरणाचा र्‍हास होवून ऊर्जेची टंचाई भासत आहे. अपारंपारिक उर्जा साधनाचा  वापर अधिकाधिक  करून ऊर्जेचे संवर्धन व जतन करणे काळाची गरज बनली आहे, असे आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना सांगितले.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए.  पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू विभागाचे प्रा.मोहसीन खान यांनी केले तर आभार  प्रा.सी.टी.वसावे यांनी मानले.

Protected Content