Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील प्रभारी नगराध्यक्षांना जीवे ठार मारण्याची धमकी; अज्ञातावर गुन्हा

यावल प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्य राकेश मुरलीधर कोलते यांच्या व्हाटस्अपवर अज्ञात व्यक्तीने खुन करण्याची धमकी दिली आहे. धमकावणाऱ्या संशयीत अज्ञात आरोपी विरूध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांच्या मोबाईल क्रमांकांच्या व्हाटस्अपवर समोरील अज्ञात व्यक्तीने आपल्या व्हाटस्ॲपवर संदेशात कोलते यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत म्हटले आहे की, ३३ दिवसानंतर तुझा ३०२ करणार असून मी राजेंद्र आर.पवार व्यंकटेश नगर हरीविठ्ठल रोड जळगाव असे संदेशात नमूद आहे. यासंदर्भात राकेश कोलते यांच्या फिर्यादिवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात संशयित आरोपीविरूध्द भादवी कलम ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे अदखपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. नेताजी वंजारी तपास करीत आहेत. दरम्यान नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांना अशाप्रकारे मिळालेला जीवे ठार मारण्याचा धमकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगले उधाण आले आहे.

Exit mobile version