Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील चौधरी कन्या शाळेत मराठी दिनानिमित्त सामूहिक शपथ

यावल प्रतिनिधी । शहरातील विविध शासकीय कार्यालयासह शाळामधुन मराठी भाषा गौरव दिन मोठया सन्मानाने व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. येथील शशीकांत सखाराम चौधरी कन्या शाळेत मराठीच्या दैनंदिन वापरासाठी सामुहीक शपथ घेण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापीका पुपा अहीरराव व शिक्षीका वृंद उपस्थीत होत्या.

यावलच्या बसस्थानकावर माठी भाषा गौरव दिन व कुसंमाग्रजांच्या प्रतीमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी  येथील कला विज्ञान व वाणीज्य महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक राजु तडवी यांनी मराठी इतीहास  आणि तत्कालीन वापरातील मराठी तसेच कालानुरूप बदलले स्वरूप या विषयी सविस्तर वर्णण केले. तर येथील मुलींच्या विकास विद्यालयाच्या सेवानिवृत मुख्याध्यापीका सुरेखा जावळे यांनी मराठीतील आणि आपुलकी या  विषयी  उदाहरणासह माहीती दिली. यावल आगार चे प्रभारी व्यवस्थापक शांताराम भालेराव यांनीही अध्यक्षीय भाषण मराठी भाषा गौरव दिनाच्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन अतुल चौधरी यांनी केले. या शिवाय मराठी भाषा गौरव दिनानिमीत्ताने  यावल शहरातील विविध हायस्कुल शाळा व शासकीय कार्यालयामधुन मराठीतून बोलण्यासह दैनंदिन  मराठीच्या वापराच्या शपथ घेण्यात आल्यात. येथील शशीकांत सखाराम चौधरी कन्या  विद्यालयात मुलींनी सामुहीक शपथ घेतली. तर बसस्थानकावर गौरव दिनानिमीत्त्ताने कवी कुसुमाग्रजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली, यावलच्या एसटी बस्थानकावर संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित प्रवाश्याना तसेच एसटी कामगारांना दैनंदिन वापरात मराठीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version