Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपात सहभाग

यावल, प्रतिनिधी | येथील एसटी आगारातील सर्व कामगारांनी दुपारी १ वाजता अचानक संप पुकारला.  तर या संपात सहभागी होण्यास रावेर आगाराच्या चालक-वाहक यांनी असमर्थता दाखवली असता त्यांना महिला कर्मचाऱ्यांनी बांगड्या अर्पण केल्यात.

सविस्तर माहिती अशी की, यावल आगारातील विविध संघटनांच्या माध्यमातून अचानक रविवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी पुन्हा संपाला सुरू करण्यात आली. या संपात यावल एसटी महामंडळाचे सुमारे ३५०च्यावर विविध पदावरील आगारातील कर्मचारी यात सहभागी झाले आहे. यावल आगारातून सर्व कर्मचारी दुपारपासून अचानक राज्यव्यापी संपात सहभागी झालेत.

 

यावेळी यावलच्या बसस्थानकावर आलेल्या चोपडा-रावेर या रावेर आगाराच्या बसच्या चालक-वाहकांना येथील आगाराच्या कर्मचाऱ्यांनी बस येथेच सोडून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले असता. त्यावेळी आपण रावेर आगारात गेल्यानंतर या संपात सहभागी होण्याचे सांगितले. यावर यावल एसटी कर्मचाऱ्यांनी गांधीगिरी करत दोन्ही कर्मचाऱ्यांना हातात बांगड्या देवून आणि गळ्यात फुलांची माळ टाकून गांधीगिरी केली. चोपडा येथून निघाल्याने या बसचे चालक वाहक अचानक पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होऊ शकले नव्हते. तरीही त्यांनी रावेर आगारात गेल्यानंतर आम्ही संपात सहभागी होणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलतांना सांगितले. अचानक यावेळी ऐन दिवाळी या सणासुदीच्या काळात पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठया प्रमाणावर हाल झाले. मात्र या संपाचा गैरफायदा अवैध प्रवासी वाहतुक करणारी मंडळी घेतांना दिसुन येत आहे. दरम्यान, यावल शहर भारतीय जनता पक्षाने एसटी कर्मचाऱ्यांच्या  राज्यव्यापी संपाला आपला पाठींबा दिला आहे.

Exit mobile version