Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाविद्यालयात थोर मराठी साहित्यिक कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.

 

प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा‌. अर्जुन पाटील यांनी बाप कविता सादर केली व कवितेतून कष्टकरी बापाचे महत्व विशद केले. प्रमुख वक्ते प्रा‌. गणेश जाधव म्हणाले की, मराठी ही ज्ञान संस्काराची भाषा आहे. मराठीचे महत्त्व हे मोठे आहे‌. त्यामुळे प्रत्येकाने व्यावहारिक जीवन जगताना मराठीला महत्व दिले पाहिजे.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. ‌संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठीला व्यावहारिक जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. मराठी भाषा परदेशातही वापरली जाते. एकमेकांशी संवाद साधताना नेहमी शुद्ध उच्चार केला पाहिजे त्याशिवाय मराठीचे अवांतर वाचन देखील केले पाहिजे, म्हणजे शब्दसंग्रह वाढत जाईल उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा‌‌. सुभाष कामडी यांनी केले.

 

सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्राची पाटील हिने केले तर आभार प्रा ‌.भारती सोनवणे ह्यांनी मानले. ह्यावेळी उपप्राचार्य प्रा. एम डी खैरनार, प्रा ‌‌.अर्जुन पाटील,  प्रा डॉ .एस पी कापडे, प्रा डॉ ‌.आर डी पवार, प्रा डॉ ‌.पी व्ही पावरा उपस्थित होते. प्रा डॉ. अनिल पाटील, प्रा ‌.डॉ. संतोष जाधव, प्रा ‌‌.सी टी वसावे, प्रा. मिलिंद मोरे, प्रा‌‌. डॉ. निर्मला पवार, प्रा‌‌. डॉ‌. वैशाली कोष्टी, प्रा. ईश्वर पाटील, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, प्रमोद जोहरे यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Exit mobile version