Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

यावल, प्रतिनिधी |  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, कला मंडळ व आय. क्यू. ए. सी. मार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची जयंती व अहिंसा दिन साजरा करण्यात आला.

 

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली   महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुष यांच्या प्रतिमा पूजन व माल्यार्पण उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील व सी. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ऑनलाइन कार्यक्रमात सी. के. पाटील यांचे ‘महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जीवन व कार्य ‘ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  संजय डी. पाटील उपस्थित होते. यावेळी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा व शांतता या ध्येयनिश्चिती मुळे आपल्या देशाची ओळख शांतताप्रिय देश म्हणून जगात झाली. यामुळेच  ‘जागतिक अहिंसा दिन ‘  म्हणून आज आपण साजरा करीत आहोत. महात्मा गांधी हे अहिंसेचे प्रणेते तर लालबहादूर शास्त्री हे हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात असे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केली. या ऑनलाइन कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.

या कार्यक्रमात सी. के. पाटील  यांनी दोन्ही महान नेत्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. यावेळी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार,  डॉ. सुधा खराटे, डॉ. एस. पी. कापडे, प्रा. एस. आर. गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. डी. पवार यांनी तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एच. जी. भंगाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डी. एन. मोरे, श्री.मनोज पाटील, डॉ. पी. व्ही. पावरा, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, अनिल पाटील व डी. डी. पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version