यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भालोदच्या महाविद्यालयातील डॉ. दिनेश पाटील हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डॉ.एस.पी. कापडे यांनी कला मंडळाच्या उद्घाटनाबाबत भूमिका विशद केली. डॉ.दिनेश पाटील यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. “कलेचे मानवी जीवनातील स्थान “या विषयावर त्यांनी विचार मांडले की शरीर व मनाला सांभाळण्याचे कार्य कलागुण करीत असतात. कलेत विविधता असते.
प्रत्येकात कलावंत दडलेला आहे. त्याचा शोध घेऊन त्याचा विकास करून स्वतःला सिद्ध करा. विषयाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी मकरंद अनासपुरे, नागराज मंजुळे व सचिन तेंडुलकरांचे यांचे उदाहरण दिले. प्रा. अर्जुन पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन केले की, महाविद्यालयाचे व्यासपीठ विद्यार्थ्यांना कलेची जाणीव करून देते. प्रत्येकाने कलागुणांचा योग्य विकास केला तर समाजात रोजगाराची उत्तम संधी प्राप्त होते. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री कोलते हिने केले तर आभार नितीन कोळी याने मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.सुधा खराटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र पाटील, छात्रसिंग वसावे, प्रमोद भोईटे, चेतना कोल्हे व रोहित नलावडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास अनेक विद्यार्थी उपस्थित होते.