Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील महाविद्यालयात ‘शिक्षणाचे महत्व’ विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.

 

प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या ‌‌डॉ.‌ संध्या सोनवणे व मान्यवरांच्या  हस्ते सरस्वती प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक‌ विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.एस‌.पी.कापडे यांनी केले.

 

एस. जी. पाटील महाविद्यालयातील उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ‌‌.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शिक्षण महत्व आणि गरज या विषयावर प्रथम पुष्प गुंफले. यात कार्यक्रमात म्हणाले की शिक्षणापासून समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे‌. बुध्दीमत्तेचा विकास झाला तर माणुस चारित्र्य  संपन्न होतो‌. फैजपूर येथील डी.एन. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ‌.उदय जगताप यांनी ‌उच्च शिक्षण आव्हाने, समस्या आणि संधी या विषयावर दुसरे पुष्पगुंठफताना मार्गदर्शन केले  सध्याच्या स्पर्धेच्या युगात पुस्तकी ज्ञानाबरोबरच  गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज आहे. शिवाय प्रयत्नात सातत्य ठेवुन कौशल्यगुण अंगीकारणे महत्वाचे आहे‌‌.

 

सूत्रसंचालन प्राची पाटील हिने केले तर आभार उपप्राचार्य. एम‌.डी.खैरनार व प्रा.डॉ. अनिल पाटील यांनी मानले. सदर कार्यशाळेसाठी उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा मुकेश येवले, डॉ एच.जी. भंगाळे, डॉ.आर.डी‌. पवार, डॉ.पी.व्ही. पावरा, प्रा. ईश्वर पाटील, प्रा. सुभाष कामळी, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा.एम.पी. मोरे, प्रा.गणेश जाधव, प्रा. भारती सोनवणे, डॉ. वैशाली कोष्टी डॉ. निर्मला पवार, प्रा. सि. टी.वसावे आदी उपस्थित होते.

सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील  मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद कदम, प्रमोद जोहरे, अनिल पाटील, अमृत पाटील, प्रमोद भोईटे, डी.डी. पाटील तसेच सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली‌‌.

Exit mobile version