Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महसूल पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

 

यावल, प्रातिनिधी । येथील महसुल पथकाच्या धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडुन कारवाई केली असुन, या कारवाईमुळे गौण खनिजची वाहतुक करणाऱ्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात महसुल सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यात सर्वत्र अवैधरित्या वाळुची सर्रासपणे विविध वाहनातुन वाहतुक करण्यात येत आहे. यावर वचक बसावा म्हणुन यावलचे तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम पथक गठीत केले आहे. या पथकाच्या माध्यमातुन आज दिनांक ७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास यावल शहरालगत असलेल्या हडकाई खडकाई नदीच्या पात्रात विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॉली क्रमांक एमएचडब्ल्यु ९०७६मध्ये बेकायद्याशीररित्या गौण खानिजची वाहतुक करतांना यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी, परसाडे येथील तलाठी समिर तडवी, कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे, तहसीलदारांचे वाहनचालक हिरामण सावळे यांच्या पथकाने कारवाई करीत अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे  ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे . दरम्यान अशा प्रकारे महसुल प्रशासनाच्या वतीने  अवैध मार्गाने वाळु वाहतुक करणाऱ्या माफीयावर झालेल्या कारवाईत सातत्य असणे गरजे असुन तरच या चोरीला आळा बसण्यास मदत होणार असल्याची नागरिकांमध्ये बोलले जात आहे. 

 

 

Exit mobile version