Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महसुल प्रशासन पथकाची धडक मोहीम ; वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक्टर जप्त

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल शिवारात स्थानिक महसुल प्रशासनाच्या कारवाईत अवैध वाळुची वाहतुक करतांना एका ट्रॅक्टरला पकडण्यात आले आहे. तर संबधित ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मनवेल परिसरातील साकळी मनवेल रस्त्यावर पथराळे येथुन वाळुचे ट्रॅक्टर भरून अवैध वाहतुक करतांना तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साकळीचे मंडळ अधिकारी पी. ए. कडनोर, मनवेलचे तलाठी एस. एन. तायडे , चुंचाळे पी. ए. नेहते , साकळीचे तलाठी व्ही. एस. वानखेडे , चिंचोली गावाचे तलाठी निखिल मिसाळ, कोरपावलीचे तलाठी एम. ई. तायडे , डांभुर्णीचे तलाठी आर. जी. तेल्हारकर, विरावली गावाचे कोतवाल पंढरीनाथ अडकमोल. पोलीस कर्मचारी असलम खान, सुशिल घुगे यांच्यासह महसुलच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३२ , ०५ ०२ या चंद्रकांत नामदेव कोळी राहणार शिरसाड यांच्या मालकीच्या वाहनास अवैध मार्गाने वाळुची वाहतुक करतांना पकडण्यात आले. वाहन पकडण्यात येत असल्याचे पाहुन ट्रॅक्टरचालक हा घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलीसांच्या मदतीने विरावलीचे कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांनी ट्रॅक्टर चालवुन पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. संबंधीत ट्रॅक्टर मालकास महसुल जमीन अधिनियम१९६६चे कलम ६६ ( ७ ) अन्वये दंडात्मक कारवाई संदर्भात नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहीती महसुल प्रशासनाच्या सुत्रांकडुन देण्यात आली.

Exit mobile version