Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल बस आगारात इंधन बचत प्रबोधन शिबीर संपन्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील यावल बस आगारातील कर्मचाऱ्यांसाठी इंधन पेट्रोलीअम कॉन्वर्सन असोशिएशनच्या वतीने इंधन बचत प्रबोधन व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी पुण्यातील आर.डी. शेलोद यांनी मार्गदर्शन केले.

यावलच्या एसटी आगारात एसटी महामंडळाचे मुख्य प्रवक्ते आर.डी. शेलोद, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक डी.बी. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक शिबीर केन्द्र शासनाच्या पीसीआरए इंधन पॅट्रॉलियम कॉनवर्सन रिसर्च संरक्षण असोसिएशनच्या माध्यमातून येणाऱ्या ८ दिवसात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा अशा ११ एसटी आगारात आयोजित होणारे इंधन बचत प्रबोधन शिबीरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याप्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन ,संदीप अडकमोल (यावल आगार वाहतुक निरिक्षक ), सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विजय पाटील , कमलाकर चौधरी (सहाय्यक वाहतुक निरिक्षक ) , अतुल चौधरी ( लिपिक ) ,यांच्यासह आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या प्रबोधनपर शिबीराचे सुत्रसंचालन विजय पाटील आदी उपस्थित होते. आभार संदीप अडकमोल यांनी मानले .

Exit mobile version