Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल फैजपूर रस्त्यावर दुचाकींची धडक

यावल : प्रतिनीधी । तालुक्यातील चितोडा गावाजवळ यावल फैजपूर रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होवुन दोन जण गंभीर जखमी झाले . या भीषण अपघातातील एका जखमींचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी आहे
यावलकडून फैजपूरकडे जाणारी दुचाकी (क्र एम.एच १९. एए १८०९) ने जाणारे महेमुद तडवी. (३५, रा कळमोदा) तसेच फैजपूरकडून यावलकडे दुचाकी (क्र एम. एच.o५ बी. सि. २०८८) ने टेकचंद कोल्हे (रा.पिंपरूड ) हे जात असतांना सायंकाळी चितोडा गावाजवळ दोघ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन जबर जखमी झाले

त्यांना तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉ .बी .बी .बारेला यांनी प्रथम उपचार केले मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैदयकीय विद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मात्र यावल पोलीस स्टेशनला कुठल्याही अपघाताची नोंद नसल्याचे कळते . यातील गंभीर जखमी कळमोदा येथील महेमुद रमजान तडवी जळगाव येथे उपचारा सुरु असतांना मरण पावल्याचे वृत्त आहे

Exit mobile version