Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल प्र.नगराध्यक्षांकडून नागरिकांसह पत्रकारांना कोरोना संरक्षण साहित्य व औषधींचे वाटप

यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या शहरात व तालुक्यात वाढता संभाव्य धोका लक्षा घेवुन येथील नगरपरिषदचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी शहरातील नागरीकांना मास्क, सॅनिटायझर व औषधीचे वाटप करण्यात आले.

संपुर्ण राज्याला विळखा घालणाऱ्या कोरोना संसर्गाने कहर केला असुन मागील दोन आठवड्यापासुन यावल शहरात व तालुक्यात कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतांना दिसुन येत असुन शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात १४ कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने आरोग्य प्रशासन व नगर परिषदने खबरदारीचा उपाय म्हणुन १२ प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केले असुन नागरीकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

नगरपरिषदचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी स्वखर्चाने सुमारे २ हजार नागरीकांना व पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर, ‘आर्सेनिक एल्बम-३०’ ची रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधीचे वाटप केले. यावेळी राकेश कोलते यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते धिरज महाजन आदी उपस्थितीत होते. कोलते यांच्याहस्ते पत्रकार डी.बी.पाटील, राजु कवडीवाले, अरूण पाटील, अय्युब पटेल, सुरेश पाटील, शेखर पटेल, सुनिल गावडे, ज्ञानदेव मराठे, तेजस यावलकर, पराग सराफ आदी याप्रसंगी उपस्थितीत होते.

Exit mobile version