यावल परिसरात सुटीची संधी साधून वाळुची तस्करी ; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

 

  यावल :  प्रतिनिधी  । येथील स्थानिक महसुल प्रशासनाच्या डोळेझाक कारभारामुळे  तिन दिवसात शासकीय सुटीची संधी  साधून वाळु माफीयाचा परिसरात धुमाकुळ  सुरु आहे

 

लाखो रुपयांच्या वाळुची सर्रास  चोरट्या मार्गाने विक्री होते आहे  यावल शहरात व परिसरात  शुक्रवार , शनिवार , रविवार या तिन दिवसांपासुन तालुक्यात सक्रीय असलेल्या वाळु माफीयाने प्रशासकीय यंत्रणेतीळ काही लोकांना  हाताशी धरून शहरातील विविध ठिकाणी साठवण करून ठेवलेली वाळु  विनापरवाना चढत्या भावाने विक्री करून लाखो रुपयांचा व्यवहार केल्याची चर्चा आहे

 

तहसीलदार महेश पवार  काही दिवसांपासुन वैद्यकीय रजेवर असल्याने याचा फायदा घेत काही हप्तेखोर कर्मचाऱ्यांच्या सहभागाने मोठया प्रमाणावर अवैध मार्गाने जमा केलेली वाळु व परिसरातील नद्यांमधुन उपसा केलेली वाळु खाजगी बांधकाम व्यवसायीकांना चढत्या भावाने विकण्यात आली  या सर्व प्रकाराकडे स्थानिक महसुल प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याची  चर्चा  आहे .

 

दरम्यान अवैध गौण खनिजाच्या अशा अनधिकृत धंद्यामुळे शासनाचा  लाखो रुपयांचा  महसुल बुडाला  आहे . ज्या वाळु माफीयाचे सेटींग झालेले नसते त्याच वाळु वाहतुक करणाऱ्यावर  प्रशासन  कारवाई  करीत असते  कारवाई  निव्वळ देखाव्याची असते असे  जाणकार सांगतात  जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांर्भीयाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे  आहे

 

Protected Content