यावल नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा : मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यावल, प्रतिनिधी | यावल शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी वारंवार मागणी करूनही नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याने आज मनसेतर्फे जिल्हा अध्यक्ष (जनहित) चेतन अढळकर यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे तक्रार करून यावल शहरातील समस्या व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली.

 

 

निवेदनाचा आशय असा की,  यावल शहरात अनेक समस्या उदभवल्या असून यावल नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभार चालु आहे. गेल्या पाच वर्षात यावल नगरपालिकेने करामध्ये वाढ केली आहे.  प्रत्यक्षात सुविधांचा अभाव आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होत नाही. स्वच्छतेसाठी महिन्याला न.पा. लाखो रूपये खर्च करूनही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे साथीचे आजार शहरात पसरत आहे. प्रशासन व कर्मचारी यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही त्यांचा मनमानी कारभार चालु आहे. प्रशासन व कर्मचारी यांना विश्वासात होऊन शहराच्या विकासासाठी नियोजन होत नाही. प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे कामे होत नाही. याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. शहरात नगरपालिकाकडून जी विकासकामे झाली आहे. त्या सर्व कामाची गुणवत्ता व दर्जा याकडे दुर्लक्ष ल आहे. शहरातील विस्तारीत भागात रस्त्यांची पुर्णवाट लागली आहे. खड्डेमय रस्त्यातून जातांना स्वीय सह अनेक आजार जडले आहे. शहरातील प्रत्येक विस्तारीत भागात नाला, गटारी नसल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. मात्र वारंवार तक्रारी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी करून सुध्दा ढिम्म यंत्रणेकडून नागरिकांच्या सुविधाकडेच दुर्लक्ष केले आहे. जर शहरातील महिला व पुरूषांसाठी प्रमुख ठिकाणी सार्वजनिक विधी करण्यासाठी व्यवस्था नाही. यावल शहरातील अनेक कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार नगरपालिका प्रशासन व नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने झाला आहे. तसेच त्या नगरसेवकांवर नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (१) (इ) प्रमाणे अपात्र व सहा वर्षे निवडणुक बंदी करण्यात यावी व त्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून सखोल निपक्षपाती चौकशी व्हावी व तात्काळ गुन्हा नोंद व्हावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी केली आहे. निवेदनावर किशोर नन्नवरे, गौरव कोळी, शाम पवार,विपुल येवले आदीची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content