Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल नगरपरिषदेस हागणदारीमुक्त प्लस नामांकन जाहीर

 

यावल, प्रतिनिधी । येथील नगर परिषदेस केंद्र शासनाव्दारे त्र्ययस्त समितीद्वारे झालेल्या स्वच्छाता सर्वेक्षणात हागणदारीमुक्त प्लस नामांकन जाहीर करण्यात आले आहे.  या उल्लेखनिय कामगिरीबद्दल व पारदर्शी असे नियोजन करणाऱ्या मुख्यधिकारी बबन तडवी यांचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

यावल नगर परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या केन्द्रीय त्र्ययस्त समितीव्दारे स्वच्छता शहरअभियाना २०२१अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंतर्गत नोंदविण्यात आलेला अहवाल आज दि. १९ मार्च रोजी प्राप्त झाला आहे.  यावल नगर परिषदेला महाराष्ट्र स्वच्छ सर्वक्षण अभियानांतर्गत हागणदारीमुक्त प्लस  या नामांकने प्राप्त झाले आहे.  या स्वच्छता सर्वक्षण मोहीमेत महाराष्ट्र राज्यातील सुमारे १०० शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात जळगाव जिल्ह्यातून यावल नगर परिषद आणि चोपडा नगर परिषदचे नामांकन यादीत समावेश असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. यावल नगर परिषदच्या एकसंघ  कामगिरीचा हा परिणाम आहे.  नगराध्यक्ष सौ. नौशाद मुबारक तडवी, गटनेते अतुल वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्यधिकारी बबन तडवी, नगर परिषदचे नोडेल अधिकारी रमाकांत मोरे, स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे, कार्यालय अधिक्षक विजय बडे, कनिष्ठ बांधकाम अभियंता योगेश मदने, सिटी कॉरीडीनेटर राधा पोतदार, नगर रचना अभियंता स्वप्नील म्हस्के यांनी या स्वच्छता अभियानास यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

Exit mobile version