Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल दरोडा ; १ संशयित पकडला

 

 

यावल : प्रतिनिधी । शहरातील कवडीवाले यांच्या सराफ दुकानावर पडलेल्या दरोड्याच्या तपासात आज पोलिसांनी १ संशयित आरोपी पकडला आहे
याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक आणी शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे दिनांक ७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. याप्रसंगी कवडीवाले कुटुंबानी १८ वर्षापुर्वी याच दुकानात झालेल्या ५० लाखाच्या धाडसी दागीने चोरीचा तपास आज पर्यंत लागलेल्या नसल्याने यामुळे या दरोडया तपास पोलीस यंत्रणेकडुन लागेल का ? असा प्रश्‍न पालकमंत्र्यां समोरच उपस्थित केला होता. तेव्हा पालकमंत्र्यांनी या दरोड्याची उकल पोलीस प्रशासन लवकरच करेल अशी ग्वाही दिली होती.

दरम्यान, दरोडेखोरोना अटक करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंढे व अप्पर पोलीस अधिक्षक चंदकांत गवळी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक बी. के. बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी केलेल्या तपासात एक आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, तपासावर काही परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी या आरोपीची ओळख अजून गुप्त ठेवलेली आहे.

Exit mobile version