Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यपदी कुरशीद पिंजारी व निहाल अहमद

यावल, प्रतिनिधी | येथील नगरपालीका दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यपदी नुकतीच कुरशीद एजाज पिंजारी व निहाल अहमद शकील अहमद यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

यावल- रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी या पदसिद्ध उपाध्यक्ष असलेल्या नगरपालीका स्तरावरील दक्षता समितीच्या अशासकीय सदस्य म्हणुन ग्राहक चळवळीशी संबधीत कुरशीद एजाज पिंजारी तर अल्पसंख्याक प्रतिनिधी म्हणुन निहाल अहमद शकील अहमद यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. हि नियुक्ती जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी केली आहे.

या निवडी बद्दल जिल्हा परिषदचे गटनेते तथा काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , नगरसेवक समिर शेख मोमीन , नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक अस्लम शेख नबी , पंचायत समिती सदस्य उमाकांत पाटील , सरफराज तडवी , कलीमा सायबु तडवी ,काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थितीती लावून सत्कार केले.

Exit mobile version