यावल तालुक्यात रस्त्यांची दुर्दशा : लोकप्रतिनिधींनी समस्या सोडविण्याची मागणी

यावल, प्रतिनिधी | यावल ते विरावली व विरावली ते दहीगाव या मार्गावरील वर्दळीच्या रस्त्याची ठीक ठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी दयनिय अवस्था झाली आहे. वाहनाधारकांना या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

 

यावल तालुक्यातील जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. यावल ते विरावली व विरावली ते दहिगाव काही मार्ग तसेच हिंगोणा ते भालोद व भालोद ते बामणोद व चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव, यावल ते भुसावळ, यावल ते चोपडा काही मार्ग तसेच किनगाव ते दोनगाव यांच्यासह आदी रस्त्याची मागील काही दिवसापासुन रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना अपघातासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गांवर झालेल्या अपघातात काही निरपराध लोकांना आपला जिव देखील गमावला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता या पैकी काही रस्त्यांना दुरूस्ती व डांबरीकरणासाठी निधी मिळाल्याचे वृत्त असुन , या कामांना मात्र अद्याप सुरूवात झाली नसल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या कारभारा विषयी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेवुन या मार्गावरील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरीक करीत आहे.

Protected Content