Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात पोलीस निरीक्षक धनवडे यांनी केली जनजागृती

 

यावल, प्रतिनिधी । काल मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान राजगृहावर समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेचे पडसाद तालुक्यात पडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी ग्रामीण भागात भेट देऊन जनजागृती केली.

यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी ग्रामीण परिसरातील विविध ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून आज नागरिकांमध्ये जनजागृती केली. आज सकाळपासूनच त्यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्न वरून यावल तालुक्यातील किनगाव, मोहराळे, साकळी, दोनगाव, डांभुर्णी आणि कोळन्‍हावी व यावल शहरातील सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून भेटी घेतल्या व मुंबई येथे काल घडलेल्या अनुचित प्रकार व कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर घ्यायची खबरदारी यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान, त्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी गावातील असणारे लग्न, वाढदिवस, आजारी असलेली व्यक्ती, मृत्यू पावलेल्या व्यक्ती अशा ठिकाणी जाऊन गर्दी करू नये. आपल्या स्वतःच्या सुरक्षासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अथवा कुठलेही ठोस कारण नसतांना आपल्या घराबाहेर फिरू नये तसेच तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून सोशल डिस्टन्सिंग ठेवावे व नियमित सॅनिटायझर वापर करून आपले हात स्वच्छ राखावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी नागरिकांना केले.

Exit mobile version