Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात पन्नीत रासासायानिक दारू विक्री

यावल, प्रतिनिधी | तालुक्यात पन्नी दारूची खुलेआम विक्री होत असून याला आळा घालण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

यावल तालुक्यात पन्नीच्या दारू विक्री खुलेआम होत आहे. यामुळे ही सहजपणे अल्पवयीन मुलापासुन तर तरुणांना सहजपणे उपलब्ध होत आहे. यातून व्यसनाधीनता वाढीस लागून कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहचले आहेत. तसेच अवैध दारू विक्रीने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारे होणाऱ्या अवैध दारूच्या विक्री कार्यवाही करावी अशी मागणी मोठया प्रमाणावर महीला वर्गाकडुन करण्यात येत आहे.
यावल तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून प्राण्यांवर वापरण्यात येणारी ऑक्सीटॉसीन इंजेकशन , बॅटरीत वापरण्यात येणारी सेल अशा प्रकारच्या अत्यंत घातक रसायनाव्दारे तयार होत असलेली दारू ही पन्नी पाऊचमध्ये गल्ली बोळापासुन तर सर्वत्र शाळा परिसरापासुन तर सार्वजनिक ठिकाणी १०ते २० रुपयापर्यंत राजरोसपणे विक्री होत आहे. या प्रकारामुळे तरूणांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन संपुर्ण कुटुंब उद्धवस्त होत असल्याची भयावह करणारी ह्वदयविदारक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. कुणालाही न घाबरता बिनधास्तपणे विक्री होणाऱ्या पन्नीच्या दारू विक्रीला कुणाचा आशीर्वाद आहे याची वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करून खुलेआम विक्री होणाऱ्या पन्नीच्या दारूला हदपार करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version