Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात एक कुटुंब – दोन वृक्ष उपक्रमांतर्गत हजारो वृक्षांची लागवड

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सव व श्री क्षेत्र वेरुळ येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी(मौनगिरीजी महाराज यांच्या१०८व्या जन्मोत्सवानिमीत्त  यावल तालुक्यात एक कुटुंब, दोन वृक्ष उपक्रमांतर्गत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली.

 

जय बाबाजी भक्त परिवार व जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री  श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख मार्गदर्शनाने विविध ठिकाणी एका तासात ५ लाख वृक्षरोपनाचा संकल्प करण्यात आला होता.  त्या माध्यमातुन “एक कुटुंब दोन वृक्ष” संकल्पने अंतर्गत व “महाश्रमदान ” उपक्रमांतर्गत चौथ्या श्रावणी सोमवार दि. २२ ऑगस्ट  रोजी हि वृक्षारोपणाची मोहिम राबण्यात आली. नागरीकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.  या उपक्रमात यावल तालुक्यातील भक्त परिवारातर्फे सकाळी ८ ते ९ या १ तासाच्या वेळेत एकाच वेळी हजारो वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात प्रामुख्याने तुळस, फुल झाडे, फळ,झाडे, आंबा, बेल आदी प्रकारच्या बहुमुल्य वृक्षांची लागवड करण्यात आली. ही  मोहिम यशस्वीतेसाठी तालुक्यातील यावल, सौखेहासिम, दहिगांव, विरावली, सांगवी खुर्द, चितोडा, भालोद, फैजपुर आदीसह पंचक्रोशितील सर्व जय बाबाजी भक्त परिवाराने कामकाज पाहिले.

Exit mobile version