Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात आजपासून ऑनलाईन नांव नोंदणीस प्रारंभ

 

यावल, प्रतिनिधी ।२०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामात केंद्र शासनाकडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडचे तुर खरेदी खरेदीसाठी ऑनलाईन नांव नोंदणीस आज २१ जानेवारीपासुन प्रारंभ होत आहे.

आधारभुत किमत तुर खरेदीसाठी उपअभिकर्ता संस्था म्हणून यावल तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत तुर खरेदीसाठी नावनोंदणीला२१ जानेवारी पासून सुरूवात होणार आहे.हेक्टरी खरेदी १२ क्वींटल ३४ किलो व हमीभाव ६०००₹प्रतिक्विंटल प्रमाणे राहणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपले नाव नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, तुर पिकाचा ऑनलाईन चालु खरीप हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा घेऊन संस्थेशी संपर्क करावा. शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ; अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते असे या सर्व माहीती व सुचनांचे पालन शेतकरी बांधवांनी करावे असे आवाहन तालुक्यातील सर्व तुर उत्पादक शेतकरी बांधवांना कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे.

Exit mobile version