Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर

यावल प्रतितिनिधी । तालुक्यातील बिगर अनुसुचित क्षेत्रातील ६३ ग्रामपंचायतीच्या सन २०२०-२५ या कालावधीसाठीचे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचदाचे आरक्षण गावनिहाय काढण्यात आले.

आज सकाळी नवीन प्रशासकीय इमातीत सकाळी ११ वाजता आरक्षण काढण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार आर.डी . पाटील, महसुल जमीन लिपीक दिपक भुतेकर, सुयोग पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

सरपंचपदाचे आरक्षण गावनिहाय पुढीलप्रमाणे – 

* अनुसुचित जाती सरपंचपदासाठी निवड झालेली गावे ८- यात मनवेल, शिरसाड, दहिगाव, कासवे, कोसगाव, कोरपावली, विरोदे.

* अनुसुचित जमातीसाठीचे आरक्षीत गावे एकुण २४ पुढीलप्रमाणे – भालोद, कासारखेडा, आडगाव, डांभुर्णी, चिंचोली, अंजाळे, डोंगर कोठारा, आमोदे, सांगवी बु, अट्रावल,सातोद, उंटावद, कोळवद, चुंचाळे, शिरगड, नायगाव, दुसखेडा, वढोदे प्रगणे सावदा, विरावली, किनगाव खुर्द, निमगाव, हिंगोणे, चिखली खुर्द, आणी महेलखेडी या गावांचा समावेश आहे.

* नागरीकांचा मागास प्रवर्ग साठी एकुण १६ गावांच्या आरक्षणाची सोडत पुढीलप्रमाणे – राजोरे, नावरे, वनोली, साकळी, सांगवी खुर्द, बोरखेडा बु, मोहराळे, थोरगव्हाण, बामणोद, पाडळसे, बोरावल खुर्द, पिळोदे खुर्द, न्हावी प्र . यावल, चिखली बु, किनगाव बु, सावखेडा सिम, डोणगाव.

*सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकुण १२ गावांची आरक्षण सोडत काढण्यात आली यात टाकरखेडा, न्हावी प्रगणे अडावद, पिंपरूड, पिळोदे बु, बोराळे, बोरावल बु, भालशिव, मारूळ, म्हैसवाडी, वढोदे प्र, यावल, हंबर्डी, चितोडे या गावांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येवुन जाहीर करण्यात आली. यातील महीला आरक्षण सोडत दुपारी २ वाजता प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार असल्याचे तहसीलदार महेश पवार यांनी जाहीर केले.

Exit mobile version