Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर

 

यावल, प्रतिनिधी। तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ४६ ग्रामपंचातीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून तहसीलदार यानी प्रत्यक्ष सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सरंपचपदाच्या निवडीचा कार्यक्रम तहसीलदार महेश पवार यांनी पुढीलप्रमाणे जाहीर केलेला आहे. यात १३  ते १७ फेब्रुवारी दरम्यान सरपंच निवडीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. सरपंचपदाच्या निवडीसाठी स्थानिक गावपातळीवर अनेक ठीकाणी चुरस निर्माण झाली असल्याचे दिसुन येत आहे.  सरपंचपदाच्या शर्यतीत असलेले सदस्य हे आपल्या सहकाऱ्याना घेवुन सहलीला रवाना झाले होते  ती मडंळी सरपंच निवडीचा कार्यकम  जाहीर होताच आपआपल्या गावी परतले आहे.

सरपंच निवडीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असा राहणार आहे दि. १२ फेब्रुवारी रोजी मोहराळे,  शिरसाड, दहीगाव, डोंगरकठोरे,  विरावली, अट्रावल, आमोदे,  कोळवद, हिंगोणे, बामनोद , डोणगाव येथे सरपंच निवड करण्यात येणार आहे.   

दिनांक १३ फेब्रुवारीला  रोजी मारूळ तर दि  १५ फेबुवारी रोजी दुसखेडे, कोसगाव, कोरपावली, पिप्री,  भालोद, पिळोदे खुर्द,  अंजाळे, नायगाव, वढोदे प्र. सावदा,  वनोली,  बोरखेडे बुद्रुक, पिंपरुड,  हंबर्डी, सांगवी खुर्द , किनगाव बुद्रुक येथे सरपंच निवड प्रक्रिया होणार आहे. 

दि. १६ फेब्रुवारी सावखेडेसीम, वढोदे प्र. यावल, विरोदे,  कासवे,  निमगाव, चिंचोली, महेलखेडी ,  सातोद, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी  मनवेल, वड्री खुर्द,)  राजोरे,  डांभुर्णी,  भालशिव  टाकरखेडे, बोरावल खुर्द सांगवी बुदु्रक,  उंटावद  नावरे,  आडगाव अशाप्रकारे  सरपंचपदाची संपुर्ण प्रक्रीयापार पडणार आहे.  यासाठी तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शखाली निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी ४६ अध्यासी प्राधीकृत अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

 

Exit mobile version