यावल तालुक्यातील शेती शिवारातून शेती साहित्यांची चोरी : पोलीसात तक्रार

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील तापी नदीच्या शिवारात असलेल्या टाकरखेडा गावाच्या शेत शिवारातून शेती साहित्य चोरीस जात असून त्वरित चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी   पोलिस फौजदार विनोद खांडबहाले यांच्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

 

यावल तालुक्यातील किनगाव , डांभुर्णी , चिंचोली यांच्यासह विविध गावातील शेत शिवारातून शेती साहित्यांची मोठया प्रमाणावर चोरी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. टाकरखेडा गावाच्या शेत शिवारातून देखील शेती साहित्याची चोरी करण्यात आली आहे. याबाबत तालुक्यातील टाकरखेडा येथील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमचे शेत शिवारातून स्प्रिंकलर सेट, पाण्याच्या टाक्या व नळी तसेच विद्युत मोटरच्या वायरी असे शेती साहित्य चोरीस गेल्या आहेत. या वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि चोरट्यांचा शोध घेऊन वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या निवेदनावर विजय चंद्रकांत चौधरी, रामचंद्र सुधाकर चौधरी, समाधान चौधरी, विलास काशिनाथ चौधरी या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content