Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील शेतीमालाला बोर्डा प्रमाणे भाव द्या – उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्याकडे मनसेची मागणी

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील विविध समस्या सोडविण्याची मागणी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकरयांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

निवेदनाचा आशय असा की, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना केळी पिकाचा तसेच इतर पिक मालाला बोर्डाप्रमाणे भाव मिळवा. या प्रमुख मागणीसह यावल तालुक्यातील व शहरातील समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. यात पुढील मागण्या देखील मांडण्यात आल्या. यावल तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभ नागरिकांना तात्काळ मिळावा. यावल तालुक्यातील आदिवासी व इतर नागरिकांना रेशनिंग कार्ड, जातीचे दाखल मिळणे. यावल तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे व दारू विक्री बंद करा. यावल तालुक्यातील सर्व कार्यालयातील प्रभारी अधिकारी आहेत तरी ते कायम अधिकारी देण्यात यावेत. यावल वन विभागातील अधिकारी हे भ्रष्टाचारी आहेत व ते खत पाणी घालत आहेत. तरी त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करत नसून त्यांच्यावर निलंबनाची व शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. यावल नगरपालिका मध्ये विविध कामात भ्रष्टाचार झालापासून त्याची SIT मार्फत निपक्षपाती चौकशी करण्यात यावी. यावल तालुक्यातील सर्व मुख्य रस्ते व ग्रामीण भागातील रस्ते यांची झालेली दुरावस्था याच्यावर सुधारणा करण्यात यावी. यावल तालुक्यातील ग्राम पंचायतमध्ये भ्रष्टाचार वाढला असून त्याची चौकशी व्हावी..या समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी करण्यात आली

 

Exit mobile version