Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर…!

यावल प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. आज आढळून आलेल्या अहवालात यावल तालुक्यात सात रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात पोलीस, होमगार्ड तर दोन बालकांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४८ वर पोहचला असून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. या वृत्ताला प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकारी मनिषा महाजन यांनी दुजोरा दिला आहे.

यावल कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या अहवालापैकी सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये शहरातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड व एक जण, आमोदा येथील १ तर तालुक्यातील चिचोली गावातील ३ जण यात दोन बालकांचा समावेश आहे. यावल तालुक्यात एकुण कोरोनाबाधितांचा आकडा ४८ वर पोहचला आहे. तर ५ कोरोनाबाधितांचा मृत्‍यू झाला आहे. तर पाच जण बरे होवून घरी परतले आहे. यावल शहरातील एकुण २२ क्षेत्र प्रतिबंधित आहेत तर एक चिंचोली, चुंचाळे १, कोरपावली १, बोरावल खुर्द १, आमोदा १, भालोद १, न्हावी १ अशी प्रतिबंधत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे.

प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर, पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी वास्तव्यास असलेला परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. यावल तालुक्यात दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असल्याचे तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. नागरीकांनी स्वताच खबरदारी घेवुन विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, घरातच रहावे, सुरक्षीत रहावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वारंवार विविध मार्गाने करण्यात येत आहे.

Exit mobile version