Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुका सचिवपदी विनोद कोल्हे

फैजपूर, प्रतिनिधी । नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या यावल तालुका सचिवपदी फैजपूर येथील विनोद कोल्हे यांची निवड करण्यात आली.

विनोद कोल्हे यांना निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफाशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत.

Exit mobile version