Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तहसील कार्यालयात दारूच्या नशेत दोघांचा दांगडो; पोलीसात गुन्हा

यावल प्रतिनिधी ।  येथील तहसील कार्यालयात पोलीस पाटीलासह दोन दारूड्यांचा दारूच्या नशेत दांगडो केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनात अकलुद तालुका यावल येथील कार्यरत असलेले पोलीस पाटील, किरण मधुकर वानखेडे (वय-४४) आणि दिपक विश्वनाथ झाल्टे (वय-४९)  यांनी आज १५ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत आरडाओरड करीत तहसील कार्यालयात शांततेचा भंग करीत असल्याची माहीती तहसीलदार महेश पवार यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना भ्रमणव्दारे सदरची माहीती कळविली. त्यानुसार पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दारूच्या नशेत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटने बाबतची माहीती सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी यांनी दिल्याने पोलीसांनी पोलीस पाटीलासह दोघांविरूद्ध शांततेचा भंग  केल्याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. नेताजी वंजारी, निलेश वाघ हे करीत आहे .

Exit mobile version