यावल जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची नगराध्यक्षांनी केली पाहणी

यावल, प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामास गेल्या आठवड्यात सुरुवात झालेली असून त्या कामास नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्यासह नगरसेवक यांनी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एकूण ६०लक्ष रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यापूर्वी देखील जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र त्यामध्ये फक्त साचलेला गाळ काढणे एवढीच कामे करण्यात आली होती. आता मात्र केंद्रामध्ये असलेल्या चार टप्प्यात मधील पहिल्या टप्प्यामध्ये गोटे बदलण्यात येणार असून त्यामध्ये मिक्सर सारखे चार Flocculater बसविण्यात येणार आहे व दुसऱ्या टप्प्यामध्ये नवीन ट्यूब सेंटलर व तिसऱ्या टप्प्यामध्ये पाईप सेट कलर बसविण्यात येणार आहे त्यानंतर चौथ्या टप्प्यातील फिल्टर मोडमध्ये गोधरा गुजरात येथील नदीची वाळू वापरण्यात येणार असून कोकोनट सेल देखील वापरण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यावल शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. या कामास नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांनी पाहणी केली. गणेश महाजन यांच्यासह पाणीपुरवठा अभियंता रमाकांत मोरे, बांधकाम अभियंता योगेश मदने व शिवानंद कानडे आदी अधिकारी यांनी भेट देऊन जलशुद्धीकरण केन्द्राच्या कामाची पाहणी केली .याप्रसंगी नगराध्यक्ष तथा गटनेता अतुल वसंत पाटील यांनी यावल नगर परिषदच्या जलशुद्धीकरण केन्द्राची निर्मिती १९९४ मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासुन तर आजपर्यंत मागील २६ वर्षातील काळात फ्क्त गाळ काढणे एवढीच कामे करण्यात आली होती. आता मात्र संपुर्ण जलशुद्धीकरण केन्द्राचे काम पुर्णपणे नवीन तंत्रानुसार दुरूस्त होणार असल्याने यामुळे जलशुद्धीकरणे केन्द्र पुनर्जीवन मिळणार आहे. भविष्यात यावलकरांना सुमारे विस वर्ष तरी शुद्ध पाणी पुरवठा होणार असुन किमान पुढील विस ते पंच्चवीस वर्ष तरी नगर परिषदेला केन्द्र दुरूस्तीच्या कामाची गरज पडणार \नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

Protected Content