Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल ग्रामीण रूग्णालयातील आयसोलेशन विभागाची प्रांत अधिकाऱ्याकडून पाहणी

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे संशयित रुग्ण आढळल्यास त्याला आयसोलेशन विभागात ठेवण्याची व्यवस्था यावल-फैजपुर मार्गावरील आदिवासी मुलींचे वसतीगृहात करण्यात आलेली आहे. फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी या विभागाची आज पाहणी केली.

यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, जि.प. प्रभाकर सोनवणे, पं.स. सदस्य शेखर सोपान पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी.व्ही.चौधरी, मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल कुंदाभंगाळे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये एकूण ११ खोल्या असून याठिकाणी कोरोनाचा संसर्गजन्य संशयित रुग्णांसाठी २० बेडची व्यवस्था करण्यात आली. या सर्व नागरिकांचे आरोग्याविषयी दक्षता घेऊन प्रांतअधिकारी यांनी यावल येथील मुलांचे वसतिगृह तसेच फैजपूर मार्गावरील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे आयसोलेशन विभागाची पाहणी केली. तहसीलदार आरोग्य अधिकारी व आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासन यंत्रणेला सज्ज राहण्याबाबत कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराच्या संशयित रुग्णांसाठी खबरदारी घेण्याच्या व दक्ष राहण्याच्या काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे.

Exit mobile version