Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती हरभरा खरेंदीस प्रारंभ

यावल, प्रतिनिधी । येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात नाफेडच्या शासकीय हरभरा खरेंदी केंद्राच्या खरेदीस सुरूवात करण्यात आली. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील यांच्या हस्ते तोलाकाट्या चे पुजन करण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथम क्रमांकाने आपले धान्य विक्रीसाठी उपस्थित राहणारे शेतकरी नितीन चौधरी ( रा विरोदा) यांचा सत्कार कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन तसेच बाजार समिती माजी उपसभापती व संचालक राकेश फेगडे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समिती सचिव स्वप्नील सोनवणे, सहाय्यक सचिव विजय कायस्थ, कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे.सचिव मुकुंदा तायडे आदी मान्यवर या प्रसंगी प्रमुख्याने उपस्थित होते.शासकीय हरभरा खरेदी केंद्रात ४८७५/- ₹ इतका भाव मिळणार असून शासनाकडून प्रति हेक्टरी साडेचौदा क्विंटल व जास्तितजास्त २५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत ७५० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केलेली असून शासनातर्फे नावनोंदणीस मुदतवाढ मिळाल्याने ३० एप्रिल पर्यंत रविवार व शासकीय सुटी वगळून खरेदी सोबतच नावनोंदणी देखील सुरू राहणार आहे. नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी सबएजंट म्हणून कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची नेमणुक करण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील व बाजार समितीच्या प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे

Exit mobile version