Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल कृउबाचे सहसचिव यांची सेवानिवृत्ती

यावल प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव विजय कायस्थ हे प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा कुटुंबिक कार्याक्रमात सत्कार करून निरोप देण्यात आला.

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ सहसचिव विजय कायस्थ हे आपल्या प्रदीर्घ सेवाकार्यातुन सेवानिवृत्त झाले. यावल येथील कृउबाच्या सभागृहातील दालनात नुकताच सेवापुर्ती निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सभापती व संचालक नारायण शशीकांत चौधरी, संचालक उमेश पाटील, सत्तार तडवी, सुनिल बारी, अशोक चौधरी , सचिव स्वप्नील सोनवणे , योगेश चौधरी यांच्यासह आदी कर्मचारी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपास्थित होते.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षा पासुन कार्यरत असलेले सहसचिव विजय कश्यप यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणुन यापदा वरून त्यांनी आपल्या सेवाकार्यास सुरुवात केली होती. आज ते आपल्या सेवेच्या प्रदीर्घ सेवाकार्यातुन सेवानिवृत्त झालेत. दरम्यान आज यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात सहसचिव विजय कायस्थ यांना सेवापुर्ती कार्यक्रमात सपत्नीक निरोप देण्यात आले  या निरोप समारंभा प्रसंगी कृउबा सभापती तुषार पाटील यांनी सहसचिव विजय कायस्थ यांनी केलेल्या आपल्या प्रदीर्घ सेवेत निष्काम सेवाभावी वृत्तीने केलेल्या उल्लेखनिय सेवाकार्याचा उल्लेख आपले मनोगतपर विचार मांडतांना व्यक्त केले .

Exit mobile version