यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन परिचय मेळावा संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रातिनिधी | येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  येथील यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे केंद्र क्रमांक 5388A यावल या केंद्रावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनुसार परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 

महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. पी. कापडे यांनी केले व तसेच आभार  केंद्र सहाय्यक एस. आर. ठाकूर यांनी मानले. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे यावलचे केंद्र संयोजक उपप्राचार्य प्रा. ए.पी. पाटील यांनी परिचय मेळाव्याला मार्गदर्शन करताना शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये काही पुस्तके ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी आय कार्ड व महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी विद्यापीठाच्या दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मार्गदर्शन केले की, शिक्षण हे नेहमीच गरीब आणि गरजू  विद्यार्थ्यांना उपयोगाचे आहे. अतिदुर्गम भागातील किंवा नोकरीतील विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मुक्त विद्यापीठाचे शिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. शिवाय नियमित शिक्षणापेक्षा खर्च कमी होतो त्याचा तळागाळामध्ये प्रसार झाला पाहिजे. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला. या  कार्यक्रमाला  टेक्निकल सहाय्यक एम. पी. बोरघड़े, प्रमोद भोईटे, अनिल पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content