Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल आगारात सुसज्ज सीटिंग स्लीपर आरामदायी रातराणींचे आगमन

bus

यावल, प्रतिनिधी । येथील एसटी आगारात प्रवासांच्या वाढत्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कडून दोन नव्या आरामदायी सुसज्य अशा सिटींग स्लीपर एसटी बसेस एसटी महामंडळाच्या माध्यमातुन आगारात दाखल झाल्या आहेत. या बसेस प्रवासांच्या मागणीनुसार रातराणी करीता वापरण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या बसच्या वेळेत बदल देखील करता येईल असे प्रभारी आगार व्यवस्थापक एस. व्ही. भालेराव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले .

संपुर्ण महाराष्ट्रातील राज्यातील एसटी परिवहन महामंडळाच्या वतीने २४७ एसटीच्या आगारांना त्यांच्या मागणीनुसार या नव्या अत्याधुनिक आरामदायी सीटिंग स्लीपर बस प्रवाशांचे कल लक्षात घेता खाजगी लक्झरी बसच्या तुलनेत सिटींग स्लीपर बस आणण्यात आल्या असून या बसेस राज्यातील एसटी डेपोत पाठवण्यात येत आहे. या बसेस सर्व आगारांना पाठविण्यात येणार आहे. यावलच्या आगारात परिवहन महामंडळाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या दोन बसेस दाखल झाल्या आहेत. या दोघ ही बसेस सध्या मागणीनुसार यावल ते पुणे या मार्गावर धावणार आहे. ही बस यावल च्या बस स्थानकावरून सायंकाळी ४ . ३० वाजता निघणार आहे. , या आरामदायी बसचे भाडे आकारणी साध्या बसच्या भाडेप्रमाणे घेण्यात येत असुन तालुक्यातील प्रवासांनी या साध्या भाडयात सीटिंग स्लीपर अशा आरामदायी बसचा प्रवास करावा असे आवाहन यावल प्रभारी आगार व्यवस्थापक एस . व्ही . भालेराव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक जी. पी. जंजाळ, वाहतूक निरीक्षक संदीप अडकमोल व सहाय्यक वाहतूक निरीक्षक कमलाकर चौधरी यांनी केले आहे .

Exit mobile version