Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलच्या पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव; अधिकारी बाधीत

यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असतांना आता पंचायत समितीमधील एका अधिकार्‍यालाही या विषाणूची बाधा झाल्याचे आजच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोना संसर्गाचा विळखा आता तालुक्यात वेगाने वाढला असुन, आज दुपारच्या वेळी एका शासकीय अधिकारी यांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझीटीव्ह आला आहे. यावल तालुक्यात आज सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णसंख्या ५५ झाली असून यात ३० ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची संख्या २५ आहे. यात फैजपुर शहर ७ आमोदा२ भालोद३कोरपावली २ दाहिगाव१ चुंचांळे ४ चिंचोली १ सांगवी१ अट्रावल१ बोरावल खुर्द २ अशी रुग्णसंख्या आहे.

दरम्यान, यावल पंचायत समितीमध्ये अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍याचा रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आल्याने पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या अधिकारार्‍यास मागील आठ दिवसापासुन अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना चार दिवसापुर्वीच जेटीएम कोवीड सेन्टर उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या ३५ वर्षीय अधिकार्‍याच्या कोरोना चाचणी अहवाल हा पॉझीटीव्ह आला आहे. या संदर्भातील अधिक माहीती तहसीलदार जितेन्द्र कुवर आणी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी दुजोरा दिला आहे. हा अधिकारी मुळ भुसावळ येथील राहणारा असुन , पंचायत समितीत सेवा करीत असतांना कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात आला आहे आता होता याची माहीती मिळवून आरोग्य विभागाकडून तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.

Exit mobile version