Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलच्या नगरसेवकांची फैजपुरात कोवीड सेन्टर उभारणीसाठी मदत

 

 यावल  :  प्रतिनिधी  ।   फैजपुरात कोवीड सेन्टर उभारणीसाठी यावलच्या    नगरसेवकांनी जमा केलेली ७६ हजार रुपयांची  मदत आज तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आली

 

जळगाव जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत  आहे आरोग्य प्रशासन सर्तक झाले असुन , या पार्श्वभुमीवर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी रावेर व यावल तालुक्यातील कोवीड रूग्णांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने भावनिक आवाहन केले आहे . मोठया प्रमाणावर रुग्णांची संख्या  वेगाने वाढत  असल्याने  रुग्णांची  ऑक्सीजन बेडअभावी मोठया प्रमाणावर  भटकंती होत आहे  अनेक रूग्णांना   जिव गमवावा लागला आहे  यासाठी प्रशासनाने लोकसहभागातुन ५० ऑक्सीजन बेडच्या कोवीड सेन्टरची उभारणी करण्याचे आवाहन केले आहे

 

फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या आवहानास प्रतिसाद देत आज यावल नगरपरिषदचे नगरसेवक प्रा . मुकेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश  कोलते , नगरसेवक असलम शेख नबी , नगरसेवक अभीमन्यु (हेन्द्री ) चौधरी , उपनगराध्यक्ष रुख्यमाबाई भालेराव ( महाजन ) , नगरसेविका देवयानी  महाजन , नगरसेवक समीर शेख यांनी आपल्यावतीने तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांची भेट घेवुन ७६ हजार रूपयांची मदत त्यांच्या स्वाधीन केली. महसुल प्रशासनाच्या वतीने दानसुर नागरीकांनी व सामाजिक संघटनांनी रुग्णसेवेसाठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे .

 

Exit mobile version