Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलच्या खिर्नीपुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे घराला आग; चार लाखाचे नुकसान

 

 यावल : प्रतिनिधी ।  शहरातील खिरनीपुरा परिसरात एका घराला शॉर्टसर्कीट मुळे अचानक लागलेल्या आगीमुळे कुटुंबाच्या जिवनावश्क वस्तुसह सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

नागरीकांच्या शर्थी प्रयत्नानमुळे आग आटोक्यात आणता आली . शहरातील खिरनिपुरा परिसरात राहणारे शेख भिकारी शेख चाँद आणी त्यांचे वडील शेख चाँद शेख कालु यांच्या घराला ११ मार्चरोजी रात्री सुमारास अचानक विद्युत वाहीनीत शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या  आगीत संपुर्ण घर जळुन खाक झाले  , या आगीत सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे .

 

अचानक लागलेल्या आगीमुळे घराच्या एका खोलीत अडकलेल्या दोन महीला व दोन लहान मुलांचा जिव वाचविण्यासाठी युवकांनी समयसुचकता बाळगुन आग लागलेल्या घराची भिंत पाडुन सुखरुप बाहेर काढले, थोडयाच वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभागातील नगरसेवक गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर , सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान नसीर खान आदीनी प्रयत्न केल्याने अखेर आग आटोक्यात आली . जळुन खाक झालेल्या घराच्या पंचनामा करण्यासाठी यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी ,यावल शहर तलाठी  ईश्वर कोळी  येणार होते .

 

Exit mobile version