यादव गोल्ला गवळी समाजाचा १० मे रोजी सामूहिक विवाह सोहळा

सामूहिक सोहळ्यात १५ जोडपी होणार विवाहबद्ध

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील येथील यादव गोल्ला गवळी समाजाचा १९वा सामूहिक विवाहसोहळा बुधवार १० मे रोजी बिग बाजार पटांगणात गोरज मुहूर्तावर संपन्न होणार आहे. या सोहळ्यात १५  जोडपी विवाहबद्ध  होणार असून समाज मंडळाने आतापर्यंतच्या सामूहिक सोहळ्यात ३०० पेक्षा अधिक  शुभविवाह पार पडले असल्याची  माहिती मंडळाचे अध्यक्ष अल्लड संतोष गवळी यांनी दिली.

 

यादव गोल्ला गवळी समाज आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्यामागासलेला आहे. हा समाज महाराष्ट्रासह कर्नाटक,मध्यप्रदेश,छत्तीसगड राज्यात विखुरलेला आहे. त्यामुळे मुला-मुलींचे विवाह जुळविणे पालकांसमोर कठीण असते. त्यातूनच वेळ व आर्थिक बचत व्हावी या उद्देशातून समाज मंडळाने सामूहिक विवाहाचे व्रत अंगिकारले व पहिल्या वर्षी २५ विवाह करून समाज मंडळाने समाजात जागृती केली. यावर्षीच्या १९व्या सामूहिक विवाह सोहळ्यात १५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.

 

बुधवार १० मे रोजी होणाऱ्या  विवाहसोहळ्याला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास व क्रीडामंत्री ना.गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, माजीमंत्री सुरेशदादा जैन तसेच जिल्ह्यातील आमदार,खासदार व मान्यवर उपस्थितीत राहणार आहे. विवाहसोहळ्याच्या नियोजनासाठी अध्यक्ष अल्लड संतोष, मल्लेल कन्हैया, येदू बबलू, कनबेन नितीन, धनाल नीरज, मल्लेल विजय आदी परिश्रम घेत आहेत.

Protected Content